आमदार राम शिंदे साहेब विक्रमी मतांनी विजयी होतील: अप्पासाहेब ढगे ( भाजपा युवामोर्चा कोषाध्यक्ष जामखेड)

भूमिपुत्र आमदार राम शिंदे साहेबांना विधानसभेची उमेदवारी काल जाहीर होताच भारतीय जनता पार्टीचे जामखेड चे युवा मोर्चा कोषाध्यक्ष अप्पासाहेब ढगे व कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त करत आ. राम शिंदे साहेब यांच्या विजयाचा संकल्प केला .
यावेळी बोलताना ते म्हणाले , आपला तो आपलाच असतो , भूमिपुत्र आ. राम शिंदे साहेबांनी मंत्री पदात केलेली विकासकामांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळीच ओळख निर्माण झाली.आमदार राम शिंदे साहेब यांची सर्वसामान्य जनतेबरोबर नाळ जुळली गेली आहे. मंत्री पदाच्या काळात त्यांनी मतदार संघाचा कायापालट केला. आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील भूमीसाठी गेली २० वर्ष केलेल्या अविरत कार्यामुळे आ. राम शिंदे साहेबांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली.कर्जत जामखेडचा भूमीपुत्र या नात्याने आपल्या भूमीच्या उत्कर्षासाठी कर्जत जामखेड मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ.प्रा.राम शिंदे साहेबांसाठी येणारे ३० दिवस वैयक्तिक जनसंपर्क करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.






