
आज दुधोडीचे मा. सरपंच रमेश जांभळे यांचा प्रा.आमदार राम शिंदे साहेब यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला .यावेळी दुधोडीचे विद्यमान सरपंच राजु जांभळे,उपसरपंच रविंद्र जांभळे,युवा नेते योगेश भोसले,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय भोसले ,ग्रामपंचायत सदस्य सचिन जांभळे ,युवा नेते गणेश जांभळे, गणेश गावडे ,हरिभाऊ थोरात, नागेश जांभळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.सरपंच रमेश जांभळे म्हणाले , कर्जत जामखेड मतदार संघात यावेळी आपला भूमिपुत्र आमदार झाला पाहिजे .आपला तो आपलाच असतो , आ. राम शिंदे यांनी मंत्री असताना तालुक्यात विकास गंगा आणली.परंतु सद्ध्याचे आमदार यांनी कोणतीही विकास कामे न करता फक्त पोकळ आश्वासने देवून मतदार संघ विकासापासून कोसो दूर नेला.विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे विद्यमान आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी बोलताना ते म्हणाले, दुधोडी मधील असंख्य कार्यकर्ते प्रवेश करण्यासाठी इच्छुक असून ते लवकरच प्रवेश भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार आहेत.







