नूतन प्राथमिक विद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न   

Google search engine

 

 

कर्जत तालुका प्रतिनिधी :-  अशोक सुर्यवंशी

कर्जत तालुक्यातील मिरजगाव मधील नूतन मराठी प्राथमिक विद्यालयामध्ये शिक्षक-पालक मेळावा आयोजित करण्यात होता त्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली, त्यामुळेअक्षरशः हॉलमध्ये बसण्यासाठी जागा अपुरी पडली. पालक मेळाव्यात उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर पालकांचे स्वागत श्री निंबाळकर संजय यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय सूचना श्री चव्हाण सुरज यांनी मांडली व त्यास श्रीमती. देशमुख प्रतीक्षा यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निंबाळकर संजय यांनी केले. शिक्षक मनोगत श्री हिंगणे यांनी केले.तर नानासाहेब सूर्यवंशी, प्राध्यापक अनिल घोडेचोर, अविनाश चव्हाण, उमेश म्हस्के, आकाश साबळे, श्रीमती काळंगे मॅडम, श्रीमती इंगळे लक्ष्मी, श्रीमती बोंडगे ज्योती,यांनी पालक मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नूतन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी अशोक यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांकडून होणारा मोबाईलचा अतिवापर व त्याचे दुष्परिणाम, पालक शिक्षक विद्यार्थी सुसंवाद, विद्यार्थ्यांचे आरोग्य व स्वच्छता , विद्यार्थी बौद्धिकतेबरोबर शारीरिक दृष्ट्या सुदृढ बनली पाहिजे, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सकस आहाराचे महत्व इत्यादी विषयावरती पालकांशी संवाद केला. विद्यालयातील विविध शालेय उपक्रमाबाबत यावेळी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मधील सुप्त गुणाना वाब देण्यासाठी विद्यालय नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत आहे याबाबत ही पालकांना माहिती दिली. पालक मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला पालक व पुरुष पालक उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा पालक मेळावा पार पडला. पालकांनी शाळेचे भरभरून कौतुक केले. शेवटी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर पालकांचे आभार श्री. शिंदे शरद यांनी मानले.