
श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्राम विकास प्रतिष्ठान, घारगाव संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न साईकृपा कृषि महाविद्यालय घारगाव येथे आज दि. २६ जुलाई दुपारी ०३:०० वाजता Vegan Outreach आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिट साईकृपा कृषि महाविद्यालय द्वारा आयोजित ऑनलाइन वेबिनार चे आयोजन करण्यात आले . ह्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेबिणार ची संपुर्ण माहिती सिरानी मॅडम यांनी दिली. वेबिणार चा विषय हा फूड, पल्यानेट अँड हेल्थ असा होता. त्यात मॅडम ने त्या विषयाबद्दल खुप छान मार्गदर्शन केले. जगण्यासाठी अन्न तसेच पर्यावरण किती महत्वाचे आहे हे समजून सांगितले. तसेच साईकृपा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. के. एच. निंबाळकर सर, प्रा. घोडके मॅडम व प्रा. सदगर सर हे उपस्थित होते. यानंतर प्रा. घोडके मॅडम यांनी सिराने मॅडमचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी श्री. दत्तकृपा शैक्षणिक संकुल चे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय पानसरे साहेब व सचिव अर्चनाताई पानसरे मॅडम व संस्थेचे उपअध्यक्ष श्री. साळुंखे सर तसेच संस्थेचे रजिस्टर श्री कल्याण शिंदे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.






