
कर्जत तालुक्यातील नामांकित महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज, कर्जत येथे इयत्ता दहावी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी शिक्षकवर्ग आणि शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरणामुळे हे कॉलेज विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरले आहे. यावर्षीही विज्ञान शाखेमध्ये प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.
इयत्ता ११ वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाची मोफत सुविधा
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता ११ वी ऑनलाईन अॅडमिशन फॉर्म भरून देण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच पालक व विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी कॉलेज प्रशासनाकडून विशेष मदत दिली जात आहे. सकाळी ८.०० ते दुपारी ३.०० या वेळेत ही सुविधा उपलब्ध आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे व आजच प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा हॉल तिकीट, आधार कार्ड, दोन पासपोर्ट साइज फोटो, ओटीपीसाठी मोबाईल, जात दाखला (लागू असल्यास) व नॉन क्रिमलेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास) सोबत आणणे आवश्यक आहे. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना आजच आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन केले असून अधिक माहितीसाठी संबंधित संपर्क क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल 2026 आहे.
अधिक माहितीसाठी शिक्षकांचे नावे व मोबाईल नंबर खालीलप्रमाणे —
१) काळे एस. डी. – मो. 9975353814
२) सोनावळे एस. एम. – मो. 9421582082
३) खाटमोडे एस. एन. – मो. 7758971644
४) गायकवाड पी. एल. – मो. 8421599261
५) शिंदे के. एस. – मो. 9970881812
६) काझी आय. व्ही . – मो.7972197776
७) काकडे एस. एन. – मो.9763503530
८) गुंड एस. झेड. – मो.9527480811
९) शिंदे डी. एल. – मो. 9689622214
१०) शेख एस. ए. – मो. 9604574658
११) कोळगे एस. डी. – मो. 8208129257






