वाघवस्ती परिसरात उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी पाणीपुरवठा; युवकांचा स्तुत्य सहभाग , शिवशंभो तरुण मंडळ , वाघवस्ती यांच्या पुढाकारातून युवकांचा स्तुत्य उपक्रम

Google search engine

 

 

 

कर्जत शहरातील वाघवस्ती शेजारी असलेल्या जंगल परिसरात असलेल्या पाण्याच्या हौदामध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांसाठी पिण्याचे पाणी सोडण्याचा स्तुत्य उपक्रम स्थानिक युवकांनी एकत्र येत स्वखर्चाने राबवला. वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील पाण्याचे स्रोत आटत चालले असताना, वन्यजीवांचे हाल लक्षात घेऊन हा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला.

युवकांचा पुढाकार, पर्यावरणाची जाणीव

या उपक्रमाचे आयोजन शिवशंभो तरुण मंडळ वाघवस्ती यांच्या पुढाकारातून करण्यात आले. उपक्रमापूर्वी हौद व परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर पाण्याचा पुरवठा करून हौद भरून देण्यात आला, जेणेकरून जंगलातील हरिण, ससे, पक्षी व इतर वन्यप्राणी सुरक्षितपणे पाणी पिऊ शकतील.

या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष पंकज बाळा वाघ यांच्यासह महात्मा फुले समता परिषद कर्जत शहराध्यक्ष स्वप्निल भैय्या वाघ उपस्थित होते. तसेच गोपाल शेठ वाघ, विलास आप्पा वाघ, दादासाहेब वाघ, प्रशांत वाघ, रोहित वाघ, विशाल वाघ, सार्थक भोगे, सतीश घाटुळे आदी युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

दरवर्षी सातत्याने राबवला जाणारा उपक्रम

विशेष बाब म्हणजे हा उपक्रम एखाद्या एका दिवसापुरता मर्यादित नसून दरवर्षी नियमितपणे राबवला जातो. वन्यजीव संरक्षणाबाबत समाजात जागृती निर्माण करणे, तसेच नैसर्गिक पर्यावरणाचे संवर्धन करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या युवकांच्या पुढाकारामुळे परिसरात पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक संदेश गेला असून, इतरांनीही अशा उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन उपस्थितांनी केले.

 

*“आज जंगलातील पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. अशा परिस्थितीत वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आम्ही सर्व युवकांनी एकत्र येऊन स्वखर्चाने हा उपक्रम राबवला. प्राण्यांना पाणी मिळताना पाहून मनाला समाधान मिळते. पर्यावरणाचे रक्षण हे केवळ शासनाचे काम नसून प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यायला हवा. त्यामुळेच हा उपक्रम आम्ही दरवर्षी सातत्याने राबवत आहोत आणि पुढेही राबवत राहू.”

मा.पंकज बाळा वाघ

(अध्यक्ष – शिव शंभो तरुण मित्र मंडळ वाघ वस्ती)