
कर्जत तालुक्यातील पशुधन आरोग्य सेवेत मोलाचे योगदान देणारे, पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व कर्तव्यनिष्ठ अधिकारी डॉ. राम सुभाष अनभुले (MVSc, Gynecologist) यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
डॉ. राम अनभुले हे Livestock Development Officer, कर्जत म्हणून कार्यरत असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात पशुपालकांचा विश्वास संपादन केला आहे. पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी–01, कर्जत येथे कार्यरत असताना त्यांनी आधुनिक ज्ञान, अनुभव आणि निष्ठेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
गेल्या ३ वर्षांच्या कालावधीत कर्जत तालुक्यात १०७ लहान जनावरांवर तसेच १८८ मोठ्या जनावरांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांनी अनेक पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळले आहे. अवघड आणि जोखमीच्या शस्त्रक्रियाही अत्यंत कौशल्याने पार पाडत त्यांनी पशुवैद्यकीय सेवेला नवी दिशा दिली आहे.
Gynecologist म्हणून जनावरांच्या प्रजनन आरोग्याकडे विशेष लक्ष देत, दुभत्या जनावरांची उत्पादकता वाढवणे, आजारांचे वेळेत निदान व उपचार करणे, तसेच पशुपालकांना मार्गदर्शन करणे हे कार्य ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे ग्रामीण भागातील पशुपालकांना मोठा आधार मिळाला आहे.
कर्तव्यनिष्ठा, शिस्त, संवेदनशीलता आणि पशुसेवेची तळमळ हीच त्यांची ओळख असून, सहकारी अधिकारी, कर्मचारी व पशुपालक वर्गात त्यांना मानाचा आदर आहे.
डॉ. राम सुभाष अनभुले यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि त्यांच्या कार्यात अधिकाधिक यश लाभो, अशी मनःपूर्वक शुभेच्छा विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत. त्यांच्या सेवेमुळे कर्जत तालुक्यातील पशुधन विकास अधिक बळकट होवो, हीच सदिच्छा.






