सौ.संगीताताई प्रकाश शेळके यांच्या समर्थनार्थ उद्या रंगणार , कोरेगावमध्ये ‘कॉमेडी तडका’ होम मिनिस्टर   महिलांसाठी खास होम मिनिस्टर सन्मान सोहळा

Google search engine

कोरेगाव ता. कर्जत येथे उद्या, रविवार दि. ०७ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता एक आगळावेगळा, मनोरंजनाने भरलेला आणि महिलांना समर्पित असा ‘कॉमेडी तडका – होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. महिलांच्या कर्तृत्वाला आणि शक्तीला सलाम करण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद कोरेगाव गटाच्या भावी उमेदवार सौ. संगिताताई प्रकाश शेळके यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आला आहे.

या विशेष कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी हास्याचे बादशाह, प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण करणारे कॉमेडी किंग अभिनेते ओम यादव उपस्थित राहणार असल्याने परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या अनोख्या विनोदी शैलीमुळे उद्याचा कार्यकमातून मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे

कार्यक्रमाचे ठिकाण:

श्री कोरेश्वर महाराज मंदिरा समोर, कोरेगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर.

भाग घेणाऱ्यासाठी

प्रथम बक्षीस :– फ्रिज

द्वितीय बक्षीस :– LED TV

तृतीय बक्षीस :– मिक्सर

चतुर्थ बक्षीस :– किचन सेट

उपस्थित महिलांसाठी सन्मान आणि आनंदाची दुहेरी भेट म्हणून कार्यक्रमात लकी ड्रॉ द्वारे तब्बल ५१ साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. चालू कार्यक्रमात महिलांना वेगवेगळे गिफ्ट बॉक्स मिळणार आहेत त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये उत्साहाची लाट उसळली असून त्यामुळे आयोजकांकडून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाची सूचना:

सर्व कोरेगाव पंचक्रोशीतील महिलांनी वेळेवर उपस्थित राहून नाव नोंदणी करावी, अशी विशेष विनंती आयोजकांनी केली आहे.

कार्यक्रमाचे आयोजक

पै. अजित (दादा) शेळके मित्र मंडळ कोरेगाव जिल्हापरिषद गट .