
गेल्या महिन्यात कर्जत तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने सर्व कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्ते , शेती,पिकांचे मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झाले. पुराच्या पाण्याने शिंपोरा खेड रस्त्यावरील पुल वाहून गेल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामूळे या पुलासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब यांनी या पुलाची पाहणी करून या कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी चौंडी येथे भेट घेऊन सभापती शिंदे साहेब यांना साकडे घातले.
यावेळी बिबिषण गायकवाड , धनंजय मोरे , निवृत्ती कानगुडे, अण्णासाहेब काळे, रामदास काळे मेजर , शार्दुल काळे, अजित कानगुडे , अजय काळे, सत्यवान काळे , आबासाहेब बारस्कर , जालिंदर काळे, रामदास जाधव , रोहन काळे , सूरज माने, सागर जाधव , आजीनाथ थेटे , बाळासाहेब माने , परमेश्वर कानगुडे , पोपट काळे आदी उपस्थित होते
यावेळी सभापती आ.राम शिंदे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , शिंपोरा – खेड रस्त्यावर नदीवर पुनर्वसन निधीतून पूल बांधण्यात आला होता हा पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी मोठा पाठपुरावा करण्यात आला होता . हा पुल बांधल्यामुळे शिंपोरा, बाभुळगाव, मानेवाडी, खेड, जुना शिंपोरा तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा पुणे जिल्हयात दळणवळण करण्यासाठी मोठी सोय झाली होती. या पुलामुळे ऊस उत्पादक शेतकरी, भाजीपाला उत्पादक, व्यापारी, सामान्य नागरिक यांना मोठा दिलासा मिळाला होता.
परंतु २७ मे २०२५ रोजी झालेल्या मुळसधार पावसामुळे हा पूल वाहून गेला. त्या पुल वाहून गेल्यापासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा दळणवळण करण्यासाठी मोठ्या त्रास होत असून जुना शिंपोरा येथून नवीन शिंपोरा येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शाळेत येतात परंतु हा पुल पडल्याने शाळेतील मुलांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच बाभुळगाव-शिंपोरा येथील विद्यार्थी , शेतकरी , शेतमजूर यांची खेड व इतर ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत गैरसोय झालेली आहे.या पुलाची पाहणी करून लवकरात लवकर नवीन पूल मंजूर करून यासाठी भरघोस निधी द्यावा अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.






