वापसा होताच शेतकऱ्यांची पेरणीची लगबग

Google search engine

 

गेल्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसाने पावसाळ्याची खरी सुरुवात केली. पाऊस बंद होताचं शेतकऱ्यांनी मका ,तूर, उडीद, बाजरी असे अनेक विविध बियाण्यांची व खतांची खरेदी केली आणि वापसा होण्याची वाट पाहत बसले . सध्या पाऊस थांबल्याने, शेतीचा बऱ्यापैकी वापसा होत आहे, वापसा होताच शेतकऱ्यांनी शेतामध्ये मका, बाजरी, उडीद, तूर यांची पेरणी सुरू केली आहे .

सध्याच्या काळामध्ये ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीमधील सर्व कामे केली जात आहेत.

पूर्वी बैलांच्या साह्याने शेतीची मशागत व शेतीतील सर्व काम केले जात होती, सध्यातरी बैलांची संख्या कमी असून फारच थोड्या प्रमाणात बैलांच्या साह्याने शेती केली जात आहे.

 

प्रतिक्रिया

“पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी बैलांचा वापर केल्यामुळे, शेतकऱ्यांचा चांगलाचं, नकळत व्यायाम होत असे, सध्या नवनवीन तंत्राच्या साहाय्याने शेती केली जात आहे.

” -विठ्ठल तोंडे, प्रगतशील शेतकरी.

 

फोटो

राक्षसवाडी बुद्रुक – शेतकरी विठ्ठल तोंडे ट्रक्टरच्या सहाय्याने पेरणी करताना.