कापरेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी अंतर्गत विष्णू पोपट चव्हाण व शांताबाई मारुती धनवटे यांची संचालक पदी बिनविरोध निवड 

Google search engine

कापरेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी अंतर्गत विष्णू पोपट चव्हाण व शांताबाई मारुती धनवटे यांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली. कापरेवाडी विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी 2025 ते 2030 अंतर्गत ही बिनविरोध निवड झाली .

यावेळी कापरेवाडी, शिंदेवाडीचे लोकनियुक्त सरपंच अनिल खराडे, मा.उपसरपंच नवनाथ मोडके, इंद्रजित शिंदे , बाळासाहेब कोंडीबा खराडे , गणपत एकनाथ जाधव भाऊ , दादा बाबा कदम ,बबन बाबा रोकडे ,कांतीलाल कदम, महेश विश्वनाथ दिवटे , अप्पा काळे, डॉ.मस्छींद्र खराडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नवनियुक्त संचालक विष्णू चव्हाण व शांताबाई मारुती धनवटे , म्हणाले , येणाऱ्या काळात सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काम करणार आहे.

नवनियुक्त दोन्ही संचालकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने व सहकार्याने पॅनल प्रचंड बहुमतांनी विजयी होईल अशी ग्वाही यावेळी लोकनियुक्त सरपंच अनिल खराडे यांनी व्यक्त केली.