साईकृपा एम. बी. ए महाविद्यालयात गुंतवणूक या विषयावर परीसंवाद

Google search engine

 

 

साईकृपा इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स , घारगाव आणि जिओजीत फायनान्सिल सर्व्हिसेस , अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी “Investment Awareness session”या विषयावर परीसंवाद आयोजित करण्यात आला होता.जिओजीत फायनान्सिल सर्व्हिसेस चे मुख्याधिकारी श्री. मयूर भेडा यांनी मार्गदर्शन केले. गुंतवणूक कशी आणि कोठे करावी त्याचे फायदे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. येणाऱ्या काळात गुंतवणुकीत असणाऱ्या संधी आणि योग्य वेळी कशी गुंतवणूक करावी याची माहिती देण्यात आली. आपल्या आयुष्यात गुंतवणूक किती महत्वाची आहे त्यामुळे भविष्यात होणारे फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम दत्त कृपा शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. या वेळी संस्थेचे रजिस्टार श्री. कल्याण शिंदे सर व सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी एम. बी. ए.चे संचालक डॉ. सचिन निंभोरे यांनी मार्गदर्शन केले . डॉ. संतोष शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणव गलांडे यांनी केले. डॉ.राजेश्वर पांडे यांनी सर्वांचे आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. संतोष शिंदे, प्रा. स्नेहल दिंडे, प्रा. सादिक शेख यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. दत्तात्रय पानसरे साहेब व सचिव सौं. अर्चना पानसरे मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या.