जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेडेकर वस्ती येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा  मा.पोलिस उपनिरीक्षक तथा संचालिका स्वरनील कॉर्पोरेशन , पुणे सौ.हर्षा ताई खराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Google search engine

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेडेकर वस्ती येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मा.पोलीस उपनिरीक्षक तथा स्वरनील कॉर्पोरेशन संचालिका , पुणे सौ.हर्षा ताई अनिल खराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.हर्षा ताई खराडे होत्या .

यावेळी त्यांनी 21 जानेवारी 2025 रोजी झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले व तसेच अंगणवाडी साठी लागणारे भांडी व इतर साहित्य भेट दिले.

यावेळी बोलताना सौ.हर्षा ताई खराडे यांनी टाकीचे घाव सोसल्याशिवय देवाला देवपण येत नाही या उक्तीप्रमाणे मुलांनी आयुष्यात कष्ट करत मोठे यश मिळवावे. स्पर्धा परीक्षा तयारी विषयी त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.तसेच शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा पुस्तके वाचन करावीत. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना लहानपणापासुनच चांगले संस्कार करावेत असे आवाहन केले.विद्यार्थ्यांनी मोबाईल कमी वापरावा असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक माणिक मोडके, उपाध्यक्ष राम खराडे, सदस्य गणपत भंडारे , आबा पवणे, प्रियंका मोडके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.