
साईकृपा एम. बी. ए. कॉलेज घारगाव येथे मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीगोंदा येथील नायब तहसीलदार श्री.पंकज नेवसे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सचिन निंभोरे होते. या वेळी प्रमुख पाहुण्यांनी मतदार हा किती महत्वाचा आहे. त्याच्या मताची ताकत किती आहे आणि देशाचे भविष्य त्यावर अवलंबून असते. योग्य व्यक्तीस मतदान केल्याने देश्याच्या सामाजिक, राजकीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचावली जाते. देश्याच्या विकासात मतदाराचे महत्व अनन्य साधारण आहे. त्यामुळेच मतदार हा जागृत असला पाहिजे असे विचार मांडले व कार्यक्रमाचे योग्य नियोजन केल्या बद्दल आभार मानले. यावेळी डॉ. निंभोरे यांनी सर्वांचे आभार मानून या पुढे शासनाच्या सर्व कार्यक्रमास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व आभार मानले. यावेळी संस्थेचे रजिस्टार श्री. कल्याण शिंदे व शिक्षक वृंद डॉ. राजेश्वर पांडे, प्रा. प्रणव गलांडे, प्रा. सादिक शेख, प्रा. रेश्मा डफळ, प्रा. स्नेहल दिंडे उपस्थित होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय पानसरे साहेब व सचिव सौं अर्चनाताई पानसरे यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी एम. बी. ए. कॉलेज चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते सर्वांनी सकारात्मकतेने यात सहभाग घेऊन आपले विचार मांडले.






