महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी दादा पाटील महाविद्यालयाच्या तीन कुस्तीपट्टूंची निवड   

Google search engine

कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाचे खेळाडू, सिद्धी शेटे (६२ किलो वजनी गट), प्राची सुद्रिक (६८ किलो वजनी गट), दिव्या शीलवंत (७६ किलो वजनी गट) यांची निवड झाली आहे. सदर खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर डॉ. संतोष भुजबळ यांचे मार्गदर्शन लाभले

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने देवळी, जिल्हा वर्धा येथे आयोजित ‘वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा’ व ‘महिला महाराष्ट्र केसरी किताब २०२४-२५’ याकरिता अहिल्यानगर जिल्ह्यातील दादा पाटील महाविद्यालयाच्या सदर तीन कुस्तीपटूंची निवड झालेली आहे.

या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, प्रा. पवन कडू तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांच्या उपस्थितीमध्ये सदर खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.