
मानवाधिकार दिनानिमित्ताने सकल हिंदू समाजातर्फे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, धार्मिक दडपशाही आणि हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त करत कठोर कारवाईचे निवेदन निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे यांना देण्यात आले. आंदोलकांनी काळ्या फिती लावून तीव्र निषेध नोंदविला.
बांगलादेशातील हिंदूंच्या जीवित, संपत्ती आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचलणे, बांगलादेश सरकारला तेथील अल्पसंख्याकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी भाग पाडण्यासाठी जागतिक दबाव निर्माण करणे, केंद्र सरकारने महत्त्वाच्या असणाऱ्या या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत प्रभावी उपाययोजना सुरू कराव्यात, अन्याय आणि अत्याचारग्रस्त हिंदूंना संरक्षण आणि समर्थन देण्यासाठी विशेष धोरण आखण्यात यावे.
मोर्चाचे रुपांतर तहसील कार्यालयात सभेत झाले. येथे वक्त्यांनी तीव्र निषेध नोंदवित यावर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात , अन्यायग्रस्त हिंदूंना संरक्षण व समर्थन देण्यासाठी विशेष धोरण राबवणे.अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.






