
श्री स्वामी समर्थ कोचिंग क्लासेस च्या अध्यक्षा प्रा. सौ.मृणाली गणेश चव्हाण यांनी अनेक वर्ष शैक्षणिक, सामाजिक कार्यामध्ये योगदान दिले असून तळागाळातील सर्वसामान्य विद्यार्थ्याला शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभाग घेण्याचे ठरवल्यानंतर प्रथमतः चव्हाण मॅडमच्या मार्गदर्शनाने ते उपक्रम विद्यार्थी कसोशीने पूर्ण करतात व त्यामध्ये यशस्वीही होतात. नूतन विद्यालयामध्ये नुकतेच गणित – विज्ञान प्रदर्शन पार पडले , त्यामध्ये कु. अपेक्षा आनंद चव्हाण इयत्ता आठवी विज्ञान विभागात प्रथम क्रमांक, कु. मृणाल सतीश इंदलकर इयत्ता 11 वी (विज्ञान) गणित प्रदर्शन प्रथम क्रमांक , कु. सह्याद्री संदीप कारंजकर इयत्ता आठवी विज्ञान विभागात उत्तेजनार्थ क्रमांक, कु. इशा सचिन खेतमाळस इयत्ता सहावी गणित विभागात तृतीय क्रमांक, कु. ओवी निलेश कटारे विज्ञान विभागात उत्तेजनार्थ क्रमांक पटकावल्याने श्री स्वामी समर्थ कोचिंग क्लासेसच्या वतीने प्रा.सौ. मृणाली चव्हाण ( M.Sc.B.ed, M.A. English.) या सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन करून सर्वांना बक्षीसे दिली. दिवसेंदिवस क्लासच्या बाबतीत विद्यार्थीनी संख्या मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थिनींना आवश्यकतेनुसार ज्ञानार्जन करण्याचे काम श्री स्वामी समर्थ कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून येत आहे. अल्पावधीतच या क्लासने परिसरात मोठे यश संपादन केले आहे. परिसरात श्री स्वामी समर्थ कोचिंग क्लासेस हा सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.






