हिंदू मुस्लिम एकता  जपत दिला समाजाला आदर्श   सुरतचे उद्योजक व कोपर्डी चे ग्रामस्थ सूनलाल पठाण यांनी मारुती मंदिर बांधकामांसाठी दिला ५५ हजार निधी

Google search engine

 

जातिधर्माच्या नावावर परस्पर द्वेषाची पेरणी सर्वत्र होत आहे. सोशल मीडियावरील विविध पोस्ट त्याला खतपाणी देत असताना राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देत सुरत

चे उद्योजक सूनलाल पठाण यांनी कोपर्डी येथील मारुती मंदिर उभारणीसाठी ५५ हजार रुपयांचा निधी समर्पित केला आहे.

मारुती मंदिर निर्माणात सर्वांनी आर्थिक हातभार लावायला हवा, यासाठी आवाहन करण्यात आले आहे.गेली कित्येक दिवसांपासून निधी समर्पण अभियान राबविण्यात येत आहे. अशावेळी

सुरतचे व्यापारी गावचे युवा उद्योजक सुनलाल पठाण यांचेकडून ५५००० रुपये मंदिर बांधकाम साठी जमा झाले.

ते सुरत येथे मिरचीचे व्यापारी असून तालुक्यातील कोपर्डी येथील असून हॉटेल व्यवसायामध्ये ते नामांकित आहेत .कोपर्डीतील मारुती मंदिराच्या बांधकामासाठी त्यांनी ५५ हजार रुपये निधी दिलेला आहे. ते मुस्लिम समाजाचे असून सुद्धा देवाप्रती त्यांची आदर आणि भावना प्रेम आहे.

. गावातील सर्वच बांधवांनी या अभियानात आपला सहभाग नोंदविला आहे. पठाण परिवाराने मंदिरासाठी निधी समर्पित केल्यानंतर त्यांचे सर्व गावकऱ्यांनी आभार मानले . लहानसहान कारणांसाठी चमकोगिरी करणाऱ्या आणि स्वत:चे फोटो अपलोड करून प्रसिद्धी मिळविणाऱ्यांपुढे त्यांनी आपल्या कृतीतून नवीन आदर्श आखून दिला आहे.