
कार्यकुशल , कार्यसम्राट विकासामुख नेतृत्व आ.रोहित दादा पवार यांनी मिरजगाव गटात मोठा निधी दिल्यामुळे मिरजगाव शहर व परिसरातील गावांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून सर्वसामान्य जनता आ.रोहित दादा पवार यांना भरघोस मतदान करून विजयी करील अशी प्रतिक्रिया कोकणगाव चे मा.सरपंच मोहन गवारे यांनी व्यक्त केली.
यशराज हॉटेल येथे त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणूकी विषयी वार्तालाप केला.
आ.रोहित दादा पवार यांना मिरजगाव गटातून विक्रमी मत्ताधिकय्य देवून विजयी करण्यासाठी सर्व नेते, कार्यकर्ते , पदाधिकारी कंबर कसणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मिरजगाव येथील अंतर्गत रस्ते , जलजीवन मिशन अंतर्गत पाणी , भौतिक सुविधा , वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते , अद्ययावत इमारत जिल्हा परिषद शाळेची इमारत उभी करण्यासाठी पाच ५ कोटी रुपये देवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला. शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने जास्त दिवस साठवणूक करून रास्त भाव मिळावा या हेतूने धान्य कोठार, मिरजगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच सीना धरणाचे नियमित आवर्तन , हे आवर्तन गेली पाच वर्षात नियमित मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले , त्यामुळे मिरजगाव परिसरातील उलाढाली वाढून तालुक्याचे केंद्र बिंदू बनला आहे. मिरजगाव गटातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले , याचे श्रेय जाते ते फक्त आ.रोहित दादा पवार यांना .
अहिल्यानगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्गामुळे दळणवळण सुलभ झाले तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल ने आन करण्यासाठी या महामार्गाचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला आहे. विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी व इतर प्रलंबित प्रश्न मिटवण्यासाठी आ.रोहित दादा यांना मिरजगाव जिल्हा परिषद गटातून मोठे मत्ताधिक्य देवून आ.रोहित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या २५ दिवस वैयक्तीत जनसंपर्क , भेटीगाठी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध प्रलंबित प्रश्नांसाठी व विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी आ.रोहित दादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे .






