
भूमिपुत्र आमदार राम शिंदे साहेबांना विधानसभेची उमेदवारी काल जाहीर होताच भिवराज पांडूळे व युवराज भिसे , आवी दादा भिसे , अमोल आबा भिसे , नितिन भाऊ भिसे,सागर भिसे , भागवत कोल्हटकर , दिपक टकले , अजय भिसे , आसिफ पठण , संकेत खोसे , परसु भिसे , आबा खरात , संदिप भिसे , योगेश भिसे , बंडु भिसे , दादा भिसे, सार्थक वाघमारे , दिनेश भिवरकर आदी मलठन येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व वरिष्ठ नेत्यांनी जल्लोष व्यक्त करत आ. राम शिंदे साहेब यांच्या विजयाचा संकल्प केला .
यावेळी बोलताना ते म्हणाले , आपला तो आपलाच असतो ,स्थानिक नेते , कार्यकर्ते यांच्या स्वप्नांचा आ.रोहित पवार यांनी केलेला भ्रमनिरास, दादागिरी,हुकूमशाही,दडपशाही, खुन्नसपणा यामुळेच आ.राम शिंदे यांना आपला तो आपलाच असतो असे म्हणत सर्व नेत्यांनी एकत्र येत प्रेमळ, शांत, संयमी,असलेल्या प्रा. राम शिंदे यांना साथ दिली पाहिजे. आ .पवारांनी कर्जत जामखेड मधील जनता आणि त्यांचे स्थानिक प्रश्न याकडे त्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसते.सोशल मीडियाची हवा त्यांच्या डोक्यात गेल्याचे दिसते. मतदारसंघातील प्रश्नावर आ.पवार कोणतेही लक्ष घालत नाहीत. आ.पवारांचे स्विय सहाय्यक हेच त्यांचे पराभवाचे कारण ठरणार आहे. मतदासंघात अभावानेच दिसणारे रोहित पवार आता कर्जत जामखेड करांना नकोसे वाटू लागले आहेत.
भूमिपुत्र आ. राम शिंदे साहेबांनी मंत्री पदात केलेली विकासकामांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळीच ओळख निर्माण झाली.आमदार राम शिंदे साहेब यांची सर्वसामान्य जनतेबरोबर नाळ जुळली गेली आहे. मंत्री पदाच्या काळात त्यांनी मतदार संघाचा जलसंधारण व इतर कामांनी मतदार संघाचा कायापालट केला. आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील भूमीसाठी गेली २० वर्ष केलेल्या अविरत कार्यामुळे आ. प्रा .राम शिंदे साहेबांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली.कर्जत जामखेडचा भूमीपुत्र या नात्याने आपल्या भूमीच्या उत्कर्षासाठी कर्जत जामखेड मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आ.शिंदे साहेबांसाठी येणारे ३० दिवस वैयक्तिक जनसंपर्क करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.






