
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेचे विद्यार्थी विकास मंडळ आणि शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जल्लोष’ युवक महोत्सवामध्ये दादा पाटील महाविद्यालयातील ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये आठ विद्यार्थ्यांनी पारितोषिके प्राप्त केली. त्यामध्ये ,शास्त्रीय गायन, प्रथम क्रमांक- प्रियंका वाघमारे, स्वरवाद्य, द्वितीय क्रमांक- नुपूर केदार लहाडे, तालवाद्य, तृतीय क्रमांक- सौरभ विठ्ठल खामगळ, फोटोग्राफी, विकास बिडगर- द्वितीय क्रमांक, नकला (मिमीक्री), शिंदे प्रकाश दत्तु- द्वितीय क्रमांक, वक्तृत्व- रोहिणी संजय भुते- तृतीय क्रमांक, मातीकाम, प्रसाद काळे- तृतीय क्रमांक, रांगोळी, प्रणाली मंगेश भारती- द्वितीय क्रमांक हे पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आहेत
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर श्री. नवनाथ बोडखे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते जल्लोष महोत्सवात पारितोषिक प्राप्त व सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य म्हणाले की, दादा पाटील महाविद्यालय गेल्या तीन वर्षापासून गुणवत्तेच्या दृष्टीने कुस बदलत आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आदि सर्व क्षेत्रांमध्ये महाविद्यालय उत्तुंग भरारी घेत आहे. महाविद्यालय नेहमी विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी काढले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेंद्र (तात्या) फाळके, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजेंद्र निंबाळकर व बप्पासाहेब धांडे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सांस्कृतिक विभागप्रमुख व उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. स्वप्निल म्हस्के, डॉ. प्रतिमा पवार व सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.






