ज्येष्ठ शिक्षणप्रेमी ज्ञानदेव पाबळे (सर) यांच्या शिक्षणसंस्कारांना जागतिक यशाचे नवे शिखर! नातू ऋषिकेश मच्छिंद्र पाबळे यांना Nanyang Technological University (Singapore) येथे Ph.D. साठी प्रवेश

Google search engine

 

 

 

 

बाभूळगाव खालसा येथील ज्येष्ठ शिक्षणप्रेमी व माजी शिक्षक श्री. ज्ञानदेव रामचंद्र पाबळे (सर) उर्फ ‘बापू’ यांच्या जपलेल्या शिक्षणसंस्कारांना आज जागतिक स्तरावर एक मानाचा तुरा लागला आहे.

त्यांचे नातू तथा डॉ. प्रा. मच्छिंद्र जगन्नाथ पाबळे* यांचे सुपुत्र *ऋषिकेश मच्छिंद्र पाबळे* यांना आशियातील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक असलेल्या *Nanyang Technological University (NTU), Singapore* येथील College of Computing and Data Science* अंतर्गत पूर्णवेळ *Doctor of Philosophy (Ph.D.) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. विद्यापीठाच्या अधिकृत प्रवेशपत्रानुसार त्यांचा अभ्यासक्रम 10 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार आहे.

ऋषिकेश यांची उल्लेखनीय शैक्षणिक वाटचाल

ऋषिकेश यांनी यापूर्वीच संशोधन क्षेत्रात आपली चुणूक दाखवली आहे. त्यांनी *मे ते जुलै 2023* या कालावधीत *Carleton University, Ottawa (Canada)* येथे तीन महिन्यांची *Summer Research Internship* यशस्वीरित्या पूर्ण केली होती. संशोधन क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरी आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर त्यांची NTU सारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठात Ph.D. साठी निवड झाली आहे.

या यशामुळे पाबळे परिवारासह संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

*ज्ञानदेव पाबळे सर – शिक्षणाची प्रेरणा*

श्री. ज्ञानदेव पाबळे (सर) यांनी *जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, गढी (ता. गेवराई, जि. बीड)* येथे अनेक वर्षे शिक्षक म्हणून सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतर गावी परत येऊन सरपंच तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

मात्र, त्यांची खरी ओळख शिक्षणाला जीवनमूल्य मानणारे शिक्षणप्रेमी अशीच राहिली. स्वतःच्या शिक्षणात आलेल्या अडचणींचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी एकत्र कुटुंबातील प्रत्येक मुलाच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. पुतण्या मच्छिंद्र यांना आठवी पासून आणि नितीन यांना पहिलीपासून स्वतःकडे ठेवून त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली.

त्यांच्या दूरदृष्टी, शिस्त आणि शिक्षणावरील निष्ठेमुळे आज कुटुंबातील अनेक सदस्य देश-विदेशात यशस्वी करिअर करत आहेत.

तीन पिढ्यांची शिक्षण परंपरा

ज्ञानदेव पाबळे (सर), त्यांचे बंधू *जगन्नाथ पाबळे* व *नामदेव पाबळे* तसेच *सौ. सत्यभामा पाबळे* यांच्या त्याग, शिस्त, दूरदृष्टी आणि एकजुटीमुळे तीन पिढ्यांनी शिक्षणाची परंपरा जपली आहे.

आज कुटुंबातील सदस्य *कॅनडा, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि सिंगापूर* अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन, अभियांत्रिकी, वैद्यकीय, अध्यापन, माहिती तंत्रज्ञान आणि शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.

*कुटुंबातील उल्लेखनीय यश*

– *डॉ. प्रा. मच्छिंद्र जगन्नाथ पाबळे* – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, आवसरी (पुणे) येथे प्रा. व विभागप्रमुख.

– *नितीन नामदेव पाबळे* – शिक्षक, परंडा.

– *दिपक ज्ञानदेव पाबळे* – पुणे येथे IT अभियंता. TCS मधून 2018 मध्ये स्वीडन येथे आंतरराष्ट्रीय प्रकल्पावर काम करण्याची संधी.

– *डॉ. सुषमा जंजीरे-पाबळे* – श्रीगोंदा येथे वैद्यकीय सेवा.  – *डॉ. ज्योती चाळक-पाबळे* – अहमदनगर येथे होमिओपॅथी.  – *जालिंदर पाबळे, काका पाबळे* – शेती व्यवसाय.

*पुढील पिढीची जागतिक वाटचाल*

– *कु. ऋतुजा पाबळे* – ThinkSwiss Research Internship 2026-27 साठी देशातील अवघ्या सहा विद्यार्थ्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी म्हणून निवड; सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन इंटर्नशिप.

– *वर्षा जालिंदर पाबळे* – संगणक अभियांत्रिकी पदवीधर.

*अभिनंदन आणि भावना*

ऋषिकेश यांच्या या जागतिक यशाबद्दल गावकरी, माजी विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी पाबळे कुटुंबाचे अभिनंदन केले आहे.

श्री. ज्ञानदेव पाबळे सर म्हणाले, “शिक्षण हेच खरे धन आहे. आमच्या कुटुंबाने हीच शिकवण दिली आणि आज त्याचे फळ मिळत आहे. ऋषिकेशने आमचे नाव जगात उज्वल केले आहे.”

*”शिक्षणाने माणूस घडतो आणि घडलेला माणूस जग घडवतो”* – या पाबळे कुटुंबाच्या तत्वाला आज नवे परिमाण मिळाले आहे.