
कर्जत तालुक्यातील करमनवाडी व परिसरामध्ये चार दिवसापासून प्रचंड मुसळधार पाऊस होत असल्याने सर्वत्र शेती जलमय झाली आहे.शेतीतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतामधील बाजरी,मका,कांदा,उडीद, कपाशी,तूर ही पिके भुईसपाट झाली आहेत.तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची बाजरी,मका व कांदा ही पिके भिजली आहेत तसेच त्यांच्या पाळीव प्राण्यांचे पुरेसा निवारा नसल्याने पावसाने खूप हाल होताना दिसत आहेत.गेल्या चार दिवसापासून सतत मुसळधार पाऊस होत असल्याने ओढे,नदी,नाले,विहिरी,रस्ते तुडुंब भरून वाहत आहेत.तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जमिनीचे बांध फुटून माती वाहून गेली आहे.तसेच पावसामुळे पाळीव प्राण्यांना ओल्या जागेवरच बसून राहावे लागत आहे.व त्यांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.सततच्या पावसामुळे लाईटची समस्या निर्माण झाली आहे.लाईट नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकरी पूर्ण आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे शासनाने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.







