
सितपूर, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर येथे आयोजित सुभेदार लहु विलास भवर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळा व भव्य नागरी सत्कार समारंभास आवर्जून प्रा. राम शिंदे साहेब उपस्थित होते.
देशसेवा ही सर्वोच्च सेवा असून, शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशभक्तीच्या बळावर सैन्यदलात केलेली सेवा ही केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण गाव व समाजासाठी अभिमानाची बाब आहे. लहु भवर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यामुळे सितपूर ग्रामस्थांचा अभिमान द्विगुणित झाला असल्याची भावना प्रा. राम शिंदे साहेब यांनी व्यक्त केली.
सैनिकांचा हा गौरव होताना पाहून प्रत्येकाच्या मनात अभिमान आणि प्रेरणेची भावना निर्माण झाली. त्यांच्या कार्यात कुटुंबाचा त्याग व साथ महत्त्वाची असल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन. ही प्रेरणा निश्चितच आपल्या तरुण पिढीसाठी दीपस्तंभ ठरेल असे प्रा.शिंदे साहेब म्हणाले.
याप्रसंगी, ज्येष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रविण घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अशोक खेडकर, ज्येष्ठ नेते श्री. कैलास शेवाळे, मंडल अध्यक्ष श्री.अनिल गदादे यांच्यासह मान्यवर, ग्रामस्थ व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुधाकर गाढवे यांनी केले व आभार छत्रभूज भवर यांनी मानले.







