जनसेवेच्या वाटचालीत नवा टप्पा हनुमंत गावडे यांची जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष पदी निवड

Google search engine

 

नियुक्ती सामान्य कुटुंबातील, साधेपणाने जगणारा पण असामान्य स्वप्नांनी प्रेरित असा व्यक्तिमत्व – हनुमंत गावडे. सामाजिक कार्याची खरी ओढ, पक्षाप्रति निष्ठा आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ यांच्या जोरावर त्यांनी युवा नेतृत्वात एक वेगळा ठसा उमटवला आहे. गावातील गोरगरिबांच्या प्रश्नांपासून ते मोठ्या राजकीय कार्यक्रमांच्या रचनेपर्यंत नेहमी अग्रभागी असलेले हनुमंत गावडे हे राम शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यशैलीत निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परता ही तीन महत्त्वाची स्तंभ आजही कायम आहेत. ते भाजप युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख म्हणून कार्यरत असताना पक्षाची विचारधारा सोशल प्लॅटफॉर्मवर प्रभावीपणे पोहोचवण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली. नंतर भाजपा कर्जत तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांनी प्रत्येक कार्यक्रम, उपक्रम आणि मोहिम हाती घेतली आणि प्रभावी प्रसिद्धीची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

आता नुकतीच त्यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदावर निवड झाली आहे. ही केवळ वैयक्तिक यशोगाथा नाही, तर कष्ट, चिकाटी आणि निर्धाराने राजकारणात कशी प्रगती करता येते याचे हे जिवंत उदाहरण आहे. हनुमंत गावडे यांनी नेहमी मला प्रसिद्धीच्या झोतात ठेवले आणि नेमीच चांगल्या कार्यासाठी प्रोत्साहन देणारे माझे जिवलग सहकारी म्हणून मला त्यांच्या या यशाचा अभिमान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सोशल मीडिया मोर्चा आणखी बळकट होणार, पक्षाची विचारधारा जन-जनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी नवे उपक्रम आणि नवी ऊर्जा मिळणार, यात शंकाच नाही. हनुमंतभाऊ, तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

तुमची ही नवी जबाबदारी पक्षाची ताकद वाढवणारी आणि आपल्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरो, हीच अपेक्षा!

शुभेच्छुक मा. श्री पप्पूशेठ धोदाड

मा.उपसरपंच ग्रा कुंभेफळ