भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी सुदर्शन भैय्या कोपनर यांची निवड

Google search engine

 

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी युवा नेते सुदर्शन भैय्या कोपनर यांची निवड झाली.त्यांना भारतीय जनता पार्टीने जिल्हा सरचिटणीस या पदावरून थेट भाजपा युवा मोर्चा पदी बढती देऊन त्यांच्या पक्ष निष्ठेचा सन्मान केला आहे. पक्षासाठी उत्कृष्ट काम केल्यामुळे जिल्हा पातळीवर योग्य नेतृत्वाची दखल घेऊन आदरणीय विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब व राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी त्यांना न्याय दिला आहे.

प्रा.राम शिंदे साहेब, राधाकृष्ण विखे पाटील यांचे विश्वासू नेते म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. समाजातील दिन, दलीत, वंचित , गोरगरीब व सर्वच घटकांसाठी नेहमीच उपयोगी पडणारे अशी त्यांची ओळख असून युवा तरुणांचा दांडगा जनसंपर्क त्यांच्याकडे आहे. सामाजिक कामाची आवड असल्याने समाज हिताचे काम करणारे , लोकांना त्यांच्या कामासाठी वेळ देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.मा.जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल नाना कोपनर यांचे ते पुत्र आहेत त्यांच्याकडूनच सामाजिक बांधिलकी व तळागाळातील लोकांशी दांडगा संपर्क आहे.

आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये या निवडीने भारतीय जनता पार्टीला खूप मोठा फायदा होणार आहे .