
प्रत्यक्षात शिक्षकाची भूमिका उत्कृष्टरित्या आयुष्यभर प्रामाणिकपणे बजावली. त्यांच्या कामात नेहमी सकारात्मकता दिसली, आपल्या ज्ञानदानातून ,शिक्षक पदाला योग्य न्याय दिला, विद्यार्थी व्यक्तिविकास, त्यांच्याविषयी आत्मियता, स्नेह या सर्वांचे भान ठेवत काम केले. आपल्या कामातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन ,योग्य मार्गावर चालण्यास प्रेरित केले .आपल्या उत्कृष्ट सेवेतून एक सशक्त पिढी निर्माण करण्याचे काम केले असल्याचे, प्रतिपादन कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र गुंड यांनी केले.
शिक्षक बाळासाहेब चौधरी यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमात ते बोलत होते, विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यभान सुद्रिक, पर्यवेक्षक रमेश तोरकड, सुनील मंडलिक, फक्कडराव तोंडे, सर्व सेवकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक सूर्यभान सुद्रिक म्हणाले, संस्थेच्या कुळधरण विद्यालयातचं सलग 28 वर्षे हिंदी विषयाचे अध्यापन केले. त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली असे विद्यार्थी प्रिय शिक्षक ,त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाचे, समाधानाचे व आरोग्यदायी जावो अशी सदिच्छा.
बाळासाहेब चौधरी म्हणाले की, बापूसाहेब गुंड यांच्या आशीर्वादाने, संस्थेचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष महेंद्र गुंड, आमचे मार्गदर्शक राजेंद्र गुंड या सर्वांनीच माझ्यावर विश्वास ठेवला. सलग 28 वर्षे ही सेवा संस्थेच्या कुळधरण विद्यालयात झाली . त्याबद्दल आपणा सर्वांचे अंतकरणापासून आभारी आहे. त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व सेवकवृंद, संस्थेतील इतर विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व कर्मचारी आपणही वेळोवेळी सहकार्य केले. त्याबद्दल आपला ऋणी आहे.
प्रतिक्रिया
“एक अच्छा शिक्षक, समाज के निर्माण में महत्त्वपूर्ण भूमिका निभाता है ” बाळासाहेब चौधरी यांचे संस्थेला पुढील काळात मदत व मार्गदर्शन लागणार आहे .ती मिळत राहावी ही अपेक्षा ,त्यांना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा”
महेंद्र गुंड ,अध्यक्ष ,
जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ , कुळधरण






