साईकृपा कृषी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

Google search engine

 

साईकृपा कृषी महाविद्यालय, घारगाव येथील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या पाचव्या व सहाव्या सत्राच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या या परीक्षेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ८९% सरासरी निकाल मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निंबाळकर आणि परीक्षा विभाग प्रमुख के. के. पाठक यांनी ही माहिती दिली.

या यशात कुमार कुणाल काळभोर याने ८.२ सीजीपीए मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर कुमारी अस्मिता इम्फाल आणि कुमार चैतन्य जंजिरे यांनी प्रत्येकी ८.१ सीजीपीए मिळवून संयुक्तपणे द्वितीय स्थान प्राप्त केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष माननीय श्री. दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव सौ. अर्चनाताई पानसरे मॅडम, संस्थेचे रजिस्टर श्री. कल्याण शिंदे सर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निंबाळकर सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस आणि उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.