
दिनांक २१ जून रोजी न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’साजरा करण्यात आला . या निमित्ताने सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी योगासने करून हा दिवस शाळेत साजरा केला.
योग दिनाच्या निमित्ताने शिवाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. २१ जूननंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो.शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. ‘योग’ ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. निरोगी जीवनाच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळेच गेल्या दशकभरापासून दरवर्षी २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो.
या प्रसंगी श्री. किरणजी नाईक (समन्वयक ) , श्री .शिवाजी पाटील (मुख्याध्यापक), राजेंद्रकुमार काळे (पर्यवेक्षक) योगदिनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते.






