
रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल अळसुंदे विद्यालयात केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक व योग प्रशिक्षक रामदास परहर योग दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी व मानवी जीवनातील योगाचे महत्त्व पटवून सांगितले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रार्थना, प्रारंभिक कृती, योगासने प्राणायाम व मेडिटेशन इत्यादी क्रियांचे प्रात्यक्षिक सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील गोरखे, सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी बंधू भगिनींच्या समवेत विद्यार्थ्यांनी उत्साहात सादर केल्या.
समाजातील गरजू व्यक्तींना निरामय आरोग्यासाठी मॉर्निंग कार्डियाक वर्कआउट व सकस संतुलित आहार विषयक मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक व आरोग्य सल्लागार सुनील गोरखे यांनी उत्साह पूर्ण वातावरणात वर्कआउट व्यायाम प्रकार सादर केले आणि विद्यार्थ्यांनी आनंदाने वर्कआउट करून आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा वर्कआउट हा भाग करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग पोलीस विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत असणाऱ्या आर एस पी अँड पीडी विभागाच्या वतीने ट्राफिक पि.टी. कवायतीचे आयोजन R.S.P. अधिकारी सुनील अर्जुन गोरखे यांनी केले. बाल वयातच विद्यार्थ्यांच्या मनात ट्राफिक नियमाचे बीज पेरून त्यांना उद्याचा शिस्तप्रिय नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याबाबत रवींद्र विधाते यांनी प्रतिपादन केले.
या नावीन्यपूर्ण उपक्रमात सहभाग घेऊन रवींद्र विधाते, महेश सप्रे , मोहिनी केदार, सुरेशकुमार देशमुख व नितीन जगताप यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
उद्याची भावी पिढी केवळ सुशिक्षित न बनवता त्यासोबत सुसंस्कारित शिस्तप्रिय आणि निरोगी बनवण्यासाठी विद्यालय करीत असलेल्या प्रयत्ना बद्दल स्थानिक स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन व व्यवस्थापन विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, सरपंच उपसरपंच अळसुंदे ग्रामपंचायत सदस्य व शिक्षण प्रेमी नागरिकांच्या वतीने शालेय व्यवस्थापनाचे कौतुक केले.







