
राज्यस्तरीय शालेय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग स्पर्धा दि. २४, २५ व २६ मार्च दरम्यान शिर्डी येथे अहिल्यानगर जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशनच्या वतीने जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर व जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखाली नुकत्याच संपन्न झाल्या.
दादा पाटील महाविद्यालयाला कुस्तीची दीर्घ परंपरा लाभली असून महाविद्यालयाने आजपर्यंत देशाला ३५ राष्ट्रीय पातळीवरील तर १२ आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपट्टू बहाल केले आहेत. एवढेच नव्हे तर उपमहाराष्ट्र केसरी देखील प्राप्त केला आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मास रेसलिंग स्पर्धेमध्ये ऋतुजा मोटे, अश्विनी शिंदे, वैष्णवी कुमुटकर, संग्राम शिंदे यांनी सुवर्णपदके तर ओमकार चौगुले याने रजत पदक पटकावले. या विजेत्या स्पर्धकांची निवड जयपूर राजस्थान येथे येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेले असून सदर स्पर्धेत जर त्यांनी असेच घवघवीत यश मिळविले तर एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा, दिल्ली येथे सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या कुस्तीपटूंना महाविद्यालयाचे शारीरिक संचालक डॉ. संतोष भुजबळ, प्रा. पवन कडू व प्रा. दिव्या शिलवंत यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समिती सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघ, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.






