श्रुतिका किरण भगतच्या तृतीय वाढदिवसानिमित्त ह. भ. प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे 
दुरगाव येथे आज सायंकाळी 05.00 ते 07.00 यावेळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दूरगाव येथे हरिकिर्तन संपन्न होणार आहे . श्रुतिका किरण भगत हिचा वाढदिवस सोहळा सायंकाळी 07.00 ते 07.30 यावेळेत पार पडणार आहे. त्यानंतर 07.30 ते 09.00 यावेळेत स्नेहभोजन संपन्न होणार आहे. या वाढदिवस कार्यक्रमास आशीर्वाद देण्यासाठी शहाजी भगत साहेब , मा.कार्यकारी संचालक , श्री.तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना , कोल्हापूर यांचे आशीर्वाद लाभणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक विजय भीमराव भगत , रिअल इस्टेट डीलर , श्री.राजेंद्र भीमराव भगत , श्री.किरण विजय भगत व समस्त भगत परिवार यांनी केले आहे.






