इंटरमिजिएट एलिमेंटरी मध्ये टाकळी खंडेश्वरी विद्यालयाचे घवघवीत यश

Google search engine

 

टाकळी खंडेश्वरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील विद्यालयाने शासकीय चित्रकला इंटरमिजिएट व एलिमेंटरी परीक्षेची १००% निकालाची परंपरा कायम राखली.

नुकत्याच जाहीर झालेल्या इंटरमिजिएट परीक्षेच्या निकालात ८ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून सर्व उत्तीर्ण झाले असून विद्यालयाच्या देवकर तनुजा बापू ,पवार भागीरथी दादा, पवार साई विनोद, जाधव साक्षी लक्ष्मण या विद्यार्थिनी अ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत तसेच ब श्रेणीमध्ये ३ विद्यार्थी यामध्ये आखाडे कल्याणी महेश, चांडे सार्थक ज्योतीराम, फरताडे संचेती नामदेव तर हराळ कृष्णा संभाजी विद्यार्थी क श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला.

तसेच एलिमेंटरी परीक्षेत १७ विद्यार्थी प्रविष्ट असून सर्व उत्तीर्ण झाले आहेत यात मिसबा बाबाजान शेख व संस्कृती नानासाहेब वाघमारे अ श्रेणीमध्ये तर अक्षरा सुखदेव पवार, धनश्री श्रीरंग चांडे, कार्तिकी चंद्रकांत पवार ,साक्षी दत्तात्रय लबडे, स्नेहल दिगंबर पवार या ५ विद्यार्थिनी ब श्रेणीत व उर्वरित १० विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत

सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख गणेश शेळके व सर्व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.मार्गदर्शक सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आमदार रोहित दादा पवार जनरल बॉडी सदस्य राजेंद्र तात्या फाळके, स्कूल कमिटी सदस्य निळकंठ नाना पाटील, बाळासाहेब सपकाळ, किसन बापू ढोबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण नाना पाटील, सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन व सर्व सोसायटी सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब गांगर्डे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.