
कर्जत जामखेड मधील सुजाण मतदारांनी आ.प्रा.राम शिंदे साहेबांना मतदान करून आपल्या गावचा व तालुक्याचा विकासाचा अनुशेष करण्यासाठी प्रा.आ.राम शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्य तथा शक्ती केंद्र प्रमुख डॉ . सतीश काळे यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी माही , जळगाव व इतर गावांतून मोठे मत्ताधिक्य देणार असल्याची ग्वाही देत आपल्या मातीच्या विकासासाठी अखंड संघर्ष आणि वचनबद्धता. आपल्या जनतेच्या हक्कांसाठी,कर्जत जामखेडच्या उन्नतीसाठी आता कोणतीही माघार नाही. हे रण पुन्हा उभे राहण्याचे, आपल्या मातीच्या सन्मानाचे असून भूमिपुत्राचा एल्गार , आपला तो आपलाच असतो हे त्यांनी ग्रामविकास करून दाखवून दिले आहे . त्यांना यात जनतेची मोलाची साथ मिळाली आहे.
आ.पवारांनी गंडवागंडवी , निवडणुकीच्या तोंडावर देवदर्शन,गोळ्या बिस्कीट,मोकळ्या कंपास पेटी ,टी शर्ट, इव्हेंट असे लोकांनी मागणी नसलेले उद्योग करून मूळ प्रश्नापासून लोकांचे लक्ष विचलित करणे , बेरोजगारी , निवडणुकीच्या तोंडावर रोजगार मेळावे घेऊन मुलांना भुलवले व ५ वर्षात कोणाला रोजगार देऊ शकले नाही,MIDC करू शकले नाही, खोटं बोल पण रेटून बोल- साहेबांनी मंजूर केलेली अनेक कामे मीच केली आणि नारळ फोडले यात खोटारडे पणा उघड झाला , ५ वर्ष आमदार होते पहिल्याच वर्षी रोहित शर्मा ला आणले असते, ५ वर्षात स्टेडीयम झाले असते , लोकांनी विश्वास ठेवला असता पण यांना निवडणूक आली की सर्व दिसते अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की ,
आमदार प्रा राम शिंदे यांनी मंत्री पदाच्या काळात जलसंधारणचे काम केल्यामुळे तालुका सुजलाम सुफलाम झाला . आज कर्जत तालुका शेत उत्पादनात अग्रेसर बनला आहे. म्हणून काम केले. कर्जत-जामखेडमध्ये होणारी निवडणूक सामान्य नाही, मागील पाच वर्षात मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.परंतू यंदा विरोधकाला असे हरवा की, यापुढेही कोणत्याही बाहेरच्या उमेदवाराला तुमच्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवण्याची परत ताकीद झाली नाही पाहिजे. त्यासाठी मोठ्या ताकदीने कामाला लागा, जोश आणि बुध्दीने ही निवडणूक लढवा, कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या मातीतल्या भूमिपुत्राला जिंकून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.
आपला तो आपलाच असतो ,स्थानिक नेते , कार्यकर्ते यांच्या स्वप्नांचा आ.रोहित पवार यांनी केलेला भ्रमनिरास यामुळेच आ.राम शिंदे यांना आपला तो आपलाच असतो असे म्हणत सर्व नेत्यांनी एकत्र येत प्रेमळ,शांत,संयमी,असलेल्या प्रा. राम शिंदे यांना साथ दिली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.







