कोरेगाव गणातील सर्वच गावांतून आ.रोहित दादा पवार यांना मोठे मताधिक्क्य देणार :- हर्षद परदेशी जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार पक्ष यांचा निर्धार   

Google search engine

 

आ.रोहित दादा पवार यांनी कोरेगाव गणातील सर्वच गावांसाठी विक्रमी निधी दिल्यामुळे कोरेगाव गणातील गावांचा कायापालट झाला असून आ.रोहितदादांचे आभार व्यक्त करत कोरेगाव गणातील सर्वच गावांतून मा.जयवंत दादा फाळके, मा.दिलीप जाधव, मा.अंगद रुपनर, मा.श्रीमंत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आ.रोहित दादा पवार यांना सर्वाधिक विक्रमी मते मिळून देण्याचा मानस युवा नेते हर्षद परदेशी जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार पक्ष यांनी व्यक्त केला.

तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले , आ .रोहित दादा पवार हे निवडून आल्यानंतर विकासकामात कोरेगाव गणला त्यांनी न्याय दिला. पंचायत समिती सभापती पदासारखे मोठे पद देवून त्यांनी कोरेगाव गावाची शान तालुक्यात वाढवली. त्यांनी विकासकामे झफाट्याने केली . कर्जत जामखेड मधील जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळे व तसेच कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची देण म्हणून लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार हेच २०२४ ला कर्जत जामखेड मतदार संघामध्ये प्रचंड मत्ताधिक्य घेवून विजयी होतील अशी प्रतिक्रिया हर्षद परदेशी जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार पक्ष यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी पत्रकार परिषद घेवून वार्तालाप केला.

यावेळी ते बोलताना म्हणाले , आ.रोहित दादा पवार हेच खरे मतदार संघाचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाला आपले कुटुंब मानले असून आमदार झाल्यानंतर रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड तालुका विकासाच्या बाबतीत नंबर एक बनवला आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाचा कायापालट केला .

कोट्यवधी रुपयांची पथदर्शी विकासकामे हीच त्यांच्या विजयाची नांदी ठरणार आहेत. येणाऱ्या ३० दिवस हे महत्वाचे असून आमदार रोहित पवार यांच्यासाठी कट्टर कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यांसह जीवाचे रान करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अनेक वर्षांपासूनचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन घडवत आ.रोहित पवार मोठ्या मत्ताधिक्क्यांनी निवडून आले व त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघाची वेगळी ओळख निर्माण केली. तत्कालीन मंत्र्यांनी कोणतीही विकासकामे न करता फक्त मतापूरता कर्जत जामखेड मधील जनतेचा फायदा घेतला. आज संपूर्ण राज्यात कर्जत जामखेडचे विकासकामांमुळे नाव चर्चेत आहे. आ.रोहित पवार हे मोठ्या मताधिक्यांनी विधानसभा २०२४ ला निवडून येतील यात कोणतीही शंका नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आ.रोहित पवार हे निवडून आल्यानंतर मंत्री बनून कर्जत जामखेड मतदार संघ राज्यात एक नंबर तयार बनवतील. आ.रोहित दादा पवार महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून त्यांचावर आघाडीच्या अनेक नेत्यांच्या प्रचारांची जबाबदारी असणार आहे.

गेल्या निवडणुकीत आ.रोहित दादा पवार हे जायंट किलर ठरले .त्यांनी कर्जत जामखेड सारख्या मतदारसंघाची निवड करत तत्कालीन कॅबिनेट मंत्र्यांचा पराभव केला.त्यानंतर या मतदार संघात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली .अनेक वर्षापासूनची सर्वसामान्य जनतेची प्रश्न निकाली काढले. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर त्यांनी संघर्षाची भूमिका घेत ईडी व इतर दबावतंत्रापुढे न झुकता लढाऊ वृत्ती जपत स्वाभिमानी बाणा जपला .पक्ष फुटल्यानंतर त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी निष्ठा न बदलता जाणता राजा शरदचंद्र पवार साहेब यांच्या बरोबर राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. युवकांना आ .रोहीतदादांबद्दल प्रंचड विश्वास आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.