विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार योगेश अण्णा टिळेकर उद्या कर्जत जामखेड तालुका दौऱ्यावर

Google search engine

विधानपरिषदेचे नवनिर्वाचित लोकप्रिय , धडाकेबाज आमदार योगेश अण्णा टिळेकर उद्या कर्जत जामखेड दौऱ्यावर येत असल्याची माहिती हडपसर ओबीसी आघाडीचे अध्यक्ष गोकुळ बरकडे यांनी दिली.
उद्या  बेनवडी येथे दुपारी १ वाजता आ.योगेश टिळेकर येणार असून सावता महाराज मंदिर येथे ते कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी ०१:३० वाजता कर्जत येथे रथ यात्रेस भेट देणार आहेत.त्यानंतर सावता महाराज मंदिर , आंबीजळगाव येथे ०२:०० वाजता कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर चौंडी येथे ०२:३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करणार आहेत.त्यानंतर ते जवळा येथे दुपारी ०३:०० वाजता भेट देणार आहेत. त्यानंतर ते आरण येथे पुढील कार्यक्रमासाठी जाणार आहेत.