
कर्जत-जामखेड तालुक्याचे आ. रोहित पवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परीटवाडी शाळेत भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेसाठी १० संगणक संच देणार असल्याचे आश्वासन दिले . शाळेमध्ये आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांचे औक्षण करून शाळेतर्फे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आ .पवार यांनी शाळेत आल्यानंतर वृक्षांची केलेली जोपासना , हिरवीगार वृक्ष , फुलांनी बहरलेली-नटलेली ही सुंदर शाळा पाहून अतिशय आनंदित झाले. शाळेविषयी त्यांनी सुंदर शाळा असे गौरव उद्गार काढले . तसेच शाळेमध्ये त्यांच्यामार्फत सुरू असलेले रंगकाम हे अंतिम टप्प्यात आलेले पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रातनिधिक स्वरूपात एका वर्ग खोलीचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले.तसेच या रंगकामी शिक्षक व लोकांनी केलेल्या लोकसहभागाचे त्यांनी भरभरून कौतुक केले .
दादांनी शाळेतील मुलांशी हितगुज साधले .मुलांनी मिळवलेल्या वेगवेगळ्या शालेय स्पर्धांमधील गुणवत्ता ऐकून व पाहून त्यांच्याबद्दल त्या मुलांचे कौतुक व अभिनंदन करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली . तसेच इथून पुढेही शाळेसाठी वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य करत राहू व शाळेसाठी दहा संगणक संच व दोन इंटरऍक्टिव्हपॅनल देण्याची विनंती मान्य केली.
त्याचबरोबर शालेय कामकाजाचा आढावा घेत असताना वेगवेगळे राबवत असलेले उपक्रम याबद्दल दादांनी समाधान व्यक्त केले.शिक्षक हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे व ते आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे गुणवान बनवत आहेत असे शिक्षक आपल्या गावाला लाभले ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे असे गौरव उद्गार काढले व कार्यक्रमाच्या समाप्ती शेवटी दादांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शहाणे सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक संपत फरांडे,गणेश भोसले,अशितोष लोखंडे,दिपाली शेजाळ तसेच शाळा व्यवस्थापन समिती व सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.







