भांबोरा गणातून अशोक मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक

Google search engine

 

 

आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांबोरा गणात राजकीय चर्चांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर अशोक गोविंद मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अशोक मोरे हे बारडगाव सुद्रीक येथील रहिवासी असून, त्यांचे मूळ गाव खेड आहे. दोन्ही गावांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून सर्व भांबोरा गणात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.

त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक आणि विकासात्मक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. गावातील सप्ताह आयोजन, मंदिर बांधकाम, कमान उभारणी तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम यामध्ये ते नेहमीच पुढाकार घेतात. सामाजिक कार्याची आवड आणि तळमळीने केलेले काम यामुळे ते स्थानिक नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत.

अशोक मोरे हे मनमिळावू, शांत स्वभावाचे आणि सर्वांसोबत सलोख्याने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांना ग्रामीण भागातील समस्या आणि जनतेच्या अडचणींचा जवळून परिचय आहे. त्यामुळे त्यांनी स्थानिक विकासाच्या दृष्टीने काम करण्याचा संकल्प केला आहे.

ते आ. रोहित दादा पवार यांचे कट्टर समर्थक असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या पक्षाशी निष्ठेने कार्यरत आहेत. पक्षाच्या विचारधारेवर त्यांचा दृढ विश्वास असून, त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत.

भांबोरा गणात तरुण कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, अशोक मोरे यांच्या उमेदवारीच्या चर्चेने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे भांबोरा गणातील राजकीय समीकरणांमध्ये नवीन चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा आणि गावाच्या विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, “गावाचा विकास आणि समाजसेवा हेच माझे ध्येय” असे अशोक गोविंद मोरे यांनी सांगितले आहे.