
अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन व कर्जत मोबाईल रिटेलर्स असोसिएशन तर्फे 11 जुलै 2025 रोजी सकाळी 09.00 ते 05.00 यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन गोदड महाराज जन्मस्थळ , पाटील गल्ली, कर्जत येथे करण्यात आले आहे.
सर्व कर्जत तालुका मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन हे शिबिर आयोजित केले आहे. रक्तदान हेच जीवनदान , रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे एक मेकांना आधार देवूया , रक्तदानातून जीवन वाचवूया या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता असून या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेवून या सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.







