शिक्षण शास्त्र महाविद्यालय घारगाव येथे महिला दिन साजरा

Google search engine

 

श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित शिक्षण शास्त्र महाविद्यालय, घारगाव (तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर) येथे ८ मार्च २०२५ रोजी महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दत्तकृपा शैक्षणिक संकुलाचे सचिव सौ. अर्चनाताई पानसरे, प्रमुख पाहुणे प्राध्यापिका सोनाली पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मच्छिंद्र गोंटे व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्राध्यापक शिंदे स्वप्निल यांनी केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये भाग घेतला, तसेच महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक योगदानावर विशेष लक्ष दिले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरणाबाबतचे महत्त्व दर्शवले गेले आणि त्यांचा समाजातील रोल अधिक प्रगल्भ करण्यासाठी प्रेरणा दिली गेली.

कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन प्राध्यापक विनोद होले यांनी केले.

महिला दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाने याप्रकारे महिलांच्या सन्मानाची व त्यांच्या कार्याची उंची दर्शवली.