
महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती माननीय श्री. राम शिंदे साहेबांकडून जिल्हा परिषद प्राथमिक धनगरवाडी शाळेस ऑल- इन- वन इंटरॅक्टिव्ह पॅनल मिळाला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी साठी ऑल- इन- वन इंटरॅक्टिव्ह पॅनल भेट दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांचे आभार व्यक्त करत याचा सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले.इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम इंटरॅक्टिव्ह पॅनल मध्ये दिलेला आहे.इयत्ता पहिली ते चौथी अभ्यासक्रम इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यास मदत होते.
स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन इंटरऍक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून केले जाते.अवघड व क्लिष्ट संकल्पना दृश्य स्वरूपात विद्यार्थ्यांना समजावून सांगता येतात.
तसेच ऑनलाईन एज्युकेशन , कविता गायन करता येईल . इतिहास अभ्यासता येईल.अभ्यास कंटाळवाणा होणार नाही.तसेच मुलांना आवड निर्माण होऊन मुलांचा विकास होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांचे कर्जत तालुका सोशल मीडिया प्रमुख श्री.काकासाहेब पिसाळ , थेरगाव विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री.राजेंद्र शिंद, सरपंच श्री.मिनीनाथ शिंदे, सरपंच श्री.रवींद्र महारनवर,श्री.चंद्रकांत महारनवर, श्री.अण्णासाहेब महारनवर,श्री.किशोर महारनवर , सर्व शिक्षक , पालक , ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त केले.







