कापरेवाडीत महिला दिनानिमित्त शनिवारी ॲड. योगेश (भैय्यासाहेब)कापरे पाटील व दिपक (भाऊ)शिंदे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या पुढील चौकात ८० फुट उंचीचा भगवा झेंडा उभारणार व छावा चित्रपटाचे मोफत प्रदर्शन

कापरेवाडी येथे उद्या महिला दिनानिमित्त ॲड. योगेश (भैय्यासाहेब)कापरे पाटील व दिपक (भाऊ)शिंदे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या पुढील चौकात ८० फुट उंचीचा भगवा झेंडा उभारणार आहेत. त्यानंतर लगेच रात्री ८.३० वाजता छावा चित्रपटाचे भव्य दिव्य अशा स्वरूपात मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
हा चित्रपट दहा बाय वीस फुटांच्या एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. कापरेवाडी येथील ग्रामस्थांना मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपट पाहण्याचा आनंद मिळणार आहे. हा कार्यक्रम गावातील सर्व नागरिक, विशेषतः महिला आणि मुलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ऐतिहासिक आणि प्रेरणादायी असून नव्या पिढीपर्यंत त्यांच्या पराक्रमाची गाथा पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
या अनोख्या चित्रपट सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शुभ यश ट्रेडिंग कंपनीचे, शुभ यश डेअरी फार्मचे आणि शुभ यश उद्योग समूहाचे संचालक ॲड. योगेश(भैय्यासाहेब)कापरे पाटील, व दिपक (भाऊ) शिंदे भैरवनाथ युवा प्रतिष्ठान आणि शिवराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.







