अतिश सरकाळे साहेब यांची अन्न व औषध प्रशासन विभाग , गोंदिया येथे सहाय्यक आयुक्त , औषधे या पदावर पदोन्नती झाल्या बद्दल केमिस्ट असो. व शंभु ऑईल मिल तर्फे अभिनंदन 

Google search engine

अतिश शिवाजी सरकाळे साहेब चिलवडी तालुका कर्जत यांची १७ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात सहाय्यक आयुक्त , औषधे या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल केमिस्ट असो. व शंभु ऑईल मिल तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

सन २००४ मध्ये त्यांनी बी.फार्मसी पदवी प्राप्त केल्यानंतर ७ वर्ष सिपला , अजंता या औषधी उत्पादन कंपन्यांत काम केले. वर्ष २०१२ मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे औषध निरीक्षक या पदावर नियुक्ती झाली. त्यांनी जळगाव , अहिल्यानगर , पुणे येथे औषध निरीक्षक म्हणून काम केले .