
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने पठारवाडी येथे श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या श्रमसंस्कार शिबिरामध्ये आज तिसरे पुष्प नवनाथ अडसूळ यांनी गुंफले.बोलत त्यांनी याप्रसंगी महाराजांची युद्धनीती, व्यवस्थापन, शेती विषयक धोरण, सामाजिक सुधारणा, महिलांविषयी महाराजांचे विचार, याचा परामर्श घेतला . सद्य परिस्थितीत जगातील आदर्श राजे म्हणजेच शिवाजी महाराज आहेत. ते पुढे बोलताना महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पासून ते अखेरपर्यंत केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा मांडला. आजच्या तरुण पिढीसमोर शिवाजी महाराज आदर्श असले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विज्ञान विभागाचे व प्राचार्य डॉक्टर संजय ठुबे यांनी जीवनामध्ये शिस्तीला आणि नियोजनाला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे शिस्त आणि नियोजन याची सांगड घाला असे मत आपले अध्यक्षीय मनोगतामध्ये व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी पत्रकार दिवटे, शिंदे, मुन्ना पठाण, गावातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा शिरसागर या विद्यार्थिनी केले तर कार्यक्रमाचे आभार वर्षा पावणे यांनी मानले. या निवासी शिबिरास पठार वाडीतील ग्रामस्थांचा आणि देणगीदारांचा भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे.







