
जागतिक एड्स दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, प्राणशास्त्र विभाग, व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या प्रारंभी महाविद्यालयाची प्राचार्य संजय नगर साहेब यांनी एड्स जनजागृती विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राहुल पावडे यांनी एड्स बाबत समाजामध्ये असलेले समज आणि गैरसमज याविषयी सविस्तर माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राणिशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर दिग्विजय कुंभार यांनी एड्स चा उगम प्रसार सद्यस्थिती त्याचबरोबर आपण एक जबाबदार युवक म्हणून घ्यावयाची काळजी आणि आपली जबाबदारी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्याख्यानानंतर रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.प्रमोद परदेशी , प्रा.बजाज मॅडम एन एस एस कार्यक्रम अधिकारी वाल्मीक कापसे उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ.कैलास रोडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. विकास भोसले यांनी मांडले.







