

आ.रोहीत दादा पवार कर्जत जामखेड विधासभा मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा आमदार पदी विजयी झाल्याबद्दल कानगुडवाडी ग्रामस्थातर्फे त्यांना आज शुभेच्छा देऊन विठ्ठल रूक्मिणी ची प्रतिमा भेट देवून सन्मान करण्यात आला .यावेळी पै.श्री.शामभाऊ कानगुडे (मा सभापती.पं.स.कर्जत) श्री.दादासाहेब कानगुडे(मा.जि.प.सदस्य) श्री.रामशेठ कानगुडे(ग्रा.पं.सदस्य, राशीन) श्री.बाबासाहेब कानगुडे (मा.संरपंच) श्री.काकासाहेब कानगुडे(ग्रा.पं.सदस्य कानगुडवाडी) श्री.शिवाजी कानगुडे, श्री.नवनाथ कानगुडे, श्री.विनोद कानगुडे, श्री.संतोष कानगुडे सर , पै.शामभाऊ कानगुडे मित्र मंडळ व समस्त कानगुडवाडी ग्रामस्थ , कार्यकर्ते , पदाधिकारी , ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पै.शामभाऊ कानगुडे म्हणाले , आ.रोहीत दादा पवार कर्जत जामखेड विधासभा मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा आमदार पदी विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना आज आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या असून मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांप्रमाणे विकासपुरुष आ.रोहीत दादा पवार आगामी काळातही मतदार संघाचा विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढतील. कानगुडवाडी ग्रामस्थांनी यावेळी आ.रोहीत दादा यांचे अभिनंदन करून आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.







