


तालुक्यातील काळेवाडी येथील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्र येथून वालाचे बियाणे विकत घेतले.मात्र ते न उगवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कृषी सेवा केंद्राच्या मालक यांना याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांनी हात वर केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
तालुक्यातील राशीन येथील गुरुकृपा कृषी सेवा केंद्र येथे काळेवाडी येथील शेतकऱ्यांनी संजय अमृतराव काळे शिवाजी सुरेश काळे व इतर शेतकरी सतीश हिरचंद काळे , तूकाराम प्रकाश काळे यांनी अन्य कृषी सेवा केंद्रातून वालाचे बियाणे विकत घेतले होते . यातील शेतकरी संजय काळे यांनी ८ किलो बियाणे सव्वा एकर क्षेत्रात पेरले होते. त्यात त्यांनी सम्राट खत ८००० , पेरणीचा खर्च ४००० व इतर खर्च धरून २५ हजार रुपयांचे नुकसान झाले . मात्र बियाणे न उगवल्याणे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.बोगस बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांवरती अस्मानी संकट कोसळले आहे. वैष्णवी २६४ या वाणाचे हे बियाणे असून कृषी सेवा केंद्र दुकानदारास शेतकऱ्यांनी या बियाण्याविषयी विचारले त्यांनी कंपनी प्रतिनिधींशी भ्रमणध्वनी वरून बोलणे करून दिले मात्र त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर न दिल्याने शेतकऱ्यांचे समाधान झाले नसून या झालेल्या आर्थिक नुकसानीस जबाबदार कोण अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. याबाबत शेतकऱ्यांनी पुरावे गोळा करून नुकसान भरपाई साठी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.







