

भूमिपुत्र , महायुतीचे अधिकृत उमेदवार आ . प्रा.राम शिंदे साहेब यांच्यासाठी पाटेवाडी , खंडाळा , माहीजळगाव येथे पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्या कॉर्नर बैठका घेवून प्रचार सुरू केला आहे. मतदान अवघे काही दिवसांवर आले असून गणेशवाडी येथील आ.राम शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक अंकुश ठोंबरे ,बाळु कायगुडे ,युवराज ( भाऊ ) हाके , मा .सरपंच करपडी व पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांच्या विजयासाठी त्यांनी कंबर कसली असून त्यांनी काल संध्याकाळी खंडाळा , माहीजळगाव , पाटेवाडी आदी परिसरात मतदार राजाच्या भेट घेत कॉर्नर बैठका घेतल्या. यावेळी खंडाळा व गोयकरवाडी गावचे सरपंच धुळाजी खांडेकर माजी सरपंच श्री.रामहरी महानवर व ग्रामपंचायत सदस्य श्री. रंगनाथ केरबा थोरात , पाटेवाडी चे रवी शेवाळे, गोकुळ इरकर व युवक कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते . हे पदाधिकारी , कार्यकर्ते वेगवेगळ्या भागात आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ ते दररोज सकाळी लवकर उठल्यापासून ते संध्याकाळी उशिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारात व्यस्त असून तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील गावे , वाडी,वस्त्या त्यांनी पिंजून काढल्या असून आ.प्रा.राम शिंदे साहेबांची विकासकामे ते मतदार राजाला पटवून सांगत असून कमळ या चिन्हापुढे मतदान करण्याचे आवाहन करत आहेत .
यावेळी बोलताना ते म्हणाले , आ.राम शिंदे साहेब यांची वाटचाल ही केवळ कर्जत जामखेड मतदार संघापुरती मर्यादित नसून राज्याचे ते थोड्याच दिवसात कॅबिनेट मंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. आ.राम शिंदे साहेब हे सामान्य घरातील व्यक्ती असून त्यांची सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळ असल्याचे ते यावेळी सर्वांना सांगत आहेत. विशेषत: ज्या नागरीकांबरोबर ते थेट कनेक्ट आहेत त्या नागरिकांना वैयक्तिक जनसंपर्क करून आ.राम शिंदे साहेबांनी मंत्री असताना केलेली कामे व गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकासकामांची महती पटवून देत आहेत .आमदार राम शिंदे साहेब यांच्या सर्वसमावेशक आणि विकासात्मक कामाने तालुक्यातील अनेक सर्वसामान्य नागरिक , ग्रामस्थ आ.राम शिंदे साहेबांचे कौतुक करताना त्यांना दिसत आहेत. युवांच्या , गोरगरीब लोकांच्या भविष्याचा आणि विकासाचा सखोल दृष्टिकोन असल्यामुळे लोक बाजारात , चावडीवर जागोजागी आ.राम शिंदे साहेब यांच्या बद्दल जागोजागी बोलू लागले आहेत.ही निवडणूक कर्जत जामखेड करांनी हातात घेतल्याने आता फक्त आ . प्रा.राम शिंदे साहेबांचे लीड मोजायचे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.







