आ.प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे विकासपुत्र आहेत : किशोर देवमुंडे , भाजपा किसन मोर्चा सरचिटनिस 

Google search engine

 

 

माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे साहेब हेच खरे विकासपुत्र आहेत. अशी प्रतिक्रिया किशोर देवमुंडे यांनी व्यक्त केली . यावेळी बोलताना म्हणाले, माजी मंत्री प्रा . राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली.

उजनी वरून जामखेड शहराला पाणी पुरवठा मोठा निधी उपलब्ध करून जामखेड शहाराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

ग्रामीण भागातील जल जिवन मसन योजना अंतर्गत हर घर नळ योजना राबविण्यात आली.

जलयुक्त शिवार , रस्ते , घरकुल, जलसंधारण यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला . त्यामुळे खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया किशोर देवमुंडे यांनी दिली.

तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार कामामुळे तालुक्याचा कायापालट झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. अहिल्यानगर सोलापूर रस्ता , भिगवन अमरापुर रस्त्यामुळे दळणवळण सुलभ झाले. कर्जत मधील शहरवासीयांच्या उजनी वरून पाईपलाइन आणून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला. नाला खोलीकरण आदी कामामुळे दुष्काळी परिस्थिती कायमची मिटली. व शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले व तालुक्याची ओळख बागायती तालुका अशी झाली. आ. प्रा.राम शिंदे साहेब हेच खरे विकास पुत्र आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .