कोकणगाव मधून आ.रोहित दादा पवार यांना भरघोस मतदान देणार : उद्योजक शहाजी कर्पे 

Google search engine

 

कार्यकुशल , कार्य सम्राट विकासामुख नेतृत्व आ.रोहित दादा पवार यांनी कोकण गाव मधून भरघोस मतदान देणार असून कोकणगावला मोठा निधी दिल्यामुळे कोकणगावचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून सर्वसामान्य जनता आ.रोहित दादा पवार यांना भरघोस मतदान करून विजयी करील अशी प्रतिक्रिया कोकणगाव चे उद्योजक शहाजी कर्पे यांनी व्यक्त केली.

आ.रोहित दादा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार असून त्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला .

आ.रोहित दादा पवार यांना कोकणगाव मधून विक्रमी मत्ताधिकय्य देवून विजयी करण्यासाठी सर्व नेते, कार्यकर्ते , पदाधिकारी कंबर कसणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तत्कालीन मंत्र्यांनी वालवड येथे सूतगिरणी चे भूमिपूजन करून तरुणांना रोजगार देण्याची हमी दिली होती , परंतु सूतगिरणी प्रत्यक्षात झाली नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

अंतर्गत रस्ते , वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते , मिरजगाव येथील अद्ययावत जिल्हा परिषद शाळेची इमारत उभी करण्यासाठी पाच ५ कोटी रुपये देवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर केला. शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने जास्त दिवस साठवणूक करून रास्त भाव मिळावा या हेतूने धान्य कोठार, मिरजगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच सीना धरणाचे नियमित आवर्तन , हे आवर्तन गेली पाच वर्षात नियमित मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले , त्यामुळे मिरजगाव परिसरातील उलाढाली वाढून तालुक्याचे केंद्र बिंदू बनला आहे. मिरजगाव गटातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले , याचे श्रेय जाते ते फक्त आ.रोहित दादा पवार यांना .

अहिल्यानगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्गामुळे दळणवळण सुलभ झाले तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल ने आन करण्यासाठी या महामार्गाचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला आहे. विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी व इतर प्रलंबित प्रश्न मिटवण्यासाठी आ.रोहित दादा यांना मिरजगाव जिल्हा परिषद गटातून मोठे मत्ताधिक्य देवून आ.रोहित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या २३ दिवस वैयक्तीक जनसंपर्क , भेटीगाठी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध प्रलंबित प्रश्नांसाठी व विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी आ.रोहित दादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे .